सोनेरी साप...
कोकण म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला स्वर्गच जणू...
कोकणचं वर्णन शब्दांत करणं कठीण आहे, कारण तो अनुभवायचा असतो...
स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल, तर आयुष्यात एकदा तरी कोकणला नक्की भेट द्यावीच लागते...
कोकणचं वर्णन शब्दांत करणं कठीण आहे, कारण तो अनुभवायचा असतो...
स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल, तर आयुष्यात एकदा तरी कोकणला नक्की भेट द्यावीच लागते...
अशीच एक कथा मी माझ्या लहानपणी ऐकलेली इथे सांगत आहे...
यात किती खरं आणि किती खोटं याच्या वादविवादात न पडता आपण फक्त मनोरंजन म्हणून वाचावे...
चला तर कथेला सुरुवात करु...
कोकणात एकेकाळी एक अतिशय गरीब व्यक्ती राहत होती...
त्याचं कुटुंब म्हणजे त्याची पत्नी आणि दोन लहान मुलं...
एवढंच त्याचं विश्व होतं...
त्याचं कुटुंब म्हणजे त्याची पत्नी आणि दोन लहान मुलं...
एवढंच त्याचं विश्व होतं...
तो दररोज जंगलात जाऊन बांबू तोडायचा... त्या बांबूपासून तो तांदळाचं सुप, रोवळी, चटई अशा रोजच्या वापरातील वस्तू बनवायचा आणि त्या तालुक्याच्या बाजारात विकायला न्यायचा...
त्या वस्तू विकल्या गेल्या, तर घरात एक वेळचं तरी अन्न शिजायचं... पण वस्तू विकल्या गेल्या नाहीत, तर पाणी पिऊनच दिवस काढावा लागायचा... त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती...
असाच एक दिवस, तो आपल्या बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी जंगलाच्या पायवाटेने तालुक्याकडे जात होता...
चालता चालता अचानक त्याच्या समोरच पायवाटेवर एक साप विळखा घालून, फणा काढून बसलेला त्याला दिसला...
तो साप पाहून तो माणूस स्तब्ध झाला...
कारण तो साप साधा नव्हता...
तो पिवळा-धम्मक, अगदी सोन्यासारखा चमकत होता... उन्हात त्याची कांती सोन्याप्रमाणे झळकत होती... त्याच्या डोक्यावर हिरव्या रंगाचा तुरा होता आणि डोळेही हिरवेगार होते... इतका सुंदर, तेजस्वी साप त्याने आयुष्यात कधीच पाहिला नव्हता...

तो माणूस तिथेच थांबला...
सापाला हात जोडून नमस्कार करत तो म्हणाला,
“हे नागदेवता, तुझ्यासारखा नाग मी कधीच पाहिला नाही... तुझी चमकदार कांती पाहून वाटतं, जणू तू सोन्याचाच आहेस... तुझं हे दुर्मिळ दर्शन घेऊन मी इथून परत जातो...”
“हे नागदेवता, तुझ्यासारखा नाग मी कधीच पाहिला नाही... तुझी चमकदार कांती पाहून वाटतं, जणू तू सोन्याचाच आहेस... तुझं हे दुर्मिळ दर्शन घेऊन मी इथून परत जातो...”
हे बोलताना त्याच्या मनात एक विचार सतत टोचत होता...
“आज माझं कुटुंब उपाशी राहणार…”
“आज माझं कुटुंब उपाशी राहणार…”
पण त्याचा काहीच उपाय नव्हता... तो सापाला ओलांडून जाऊ शकत नव्हता, आणि त्याला इजा करण्याचा प्रश्नच नव्हता...
कारण तो साप अद्भुत होता… दैवी होता...
तेवढ्यात तो साप बोलू लागला...
“तुझा प्रामाणिकपणा, नि:स्वार्थ मन आणि स्वतःपेक्षा इतरांचा विचार करण्याची वृत्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे... तुझे चांगले दिवस आता सुरू झाले असे समज... मी तुला वरदान देतो... पण अट अशी आहे की... तु नेहमी नि:स्वार्थ राहशील,
तुझ्या दारात आलेल्याला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवणार नाहीस,
तुझ्या घरात कोणीही मांसाहार किंवा व्यसन करणार नाही...
या अटी पाळल्यास मी नेहमी तुझ्यावर प्रसन्न राहीन...”

बोलणारा साप पाहून तो माणूस अवाक झाला...
हा चमत्कार पाहून तो भारावून गेला, पण तरीही नम्रतेने त्याने सापाला नमस्कार केला...
हा चमत्कार पाहून तो भारावून गेला, पण तरीही नम्रतेने त्याने सापाला नमस्कार केला...
तेव्हा साप म्हणाला,
“तुझ्याकडचं कापड जमिनीवर पसर... डोळे बंद कर आणि तोंड दुसऱ्या बाजूला वळवून उभा राहा... मी सांगेन तेव्हाच कापड गुंडाळ... तेही डोळे बंद ठेवूनच ते हातात घे... घराकडे निघताना मात्र डोळे उघड... पण लक्षात ठेव..., कापड उचलण्याआधी जर डोळे उघडलेस, तर तुला प्राणाला मुकावं लागेल...”

तो माणूस होकारार्थी मान डोलावतो...
पुन्हा सापाला वंदन करतो...
आपलं फाटलेलं कापड जमिनीवर पसरतो आणि डोळे मिटून तोंड फिरवतो...
पुन्हा सापाला वंदन करतो...
आपलं फाटलेलं कापड जमिनीवर पसरतो आणि डोळे मिटून तोंड फिरवतो...
तो सोनेरी साप मोठा फणा काढून डोलतो आणि त्या कापडात जाऊन वेटोळे घालतो...
क्षणातच तो साप सोन्यात परावर्तित होतो...
क्षणातच तो साप सोन्यात परावर्तित होतो...
बराच वेळ कोणतीच हालचाल न ऐकू आल्यावर, तो माणूस डोळे बंद ठेवूनच कापड गुंडाळतो... मागे न पाहता चालू लागतो आणि नंतर डोळे उघडतो...
कापड मस्तकाला लावून तो घराकडे निघतो...
कापड मस्तकाला लावून तो घराकडे निघतो...
घरी पोहोचल्यावर तो देवघरात योग्य जागी त्या सोनेरी सापाची प्रतिष्ठापना करतो...
त्या सोन्याच्या नागमूर्तीला पाहून त्याचे डोळे पाणावतात... तो हळवा होतो, पण मनोमन आनंदीही होतो...
आंघोळ करून तो श्रद्धेने त्या नागाची पूजा करतो... पुढच्या दिवसापासून त्याचे आयुष्य बदलू लागते.... त्याच्या सर्व वस्तू विकल्या जाऊ लागतात...
हळूहळू तो समृद्ध होतो आणि काळाच्या ओघात गावातील एक श्रीमंत, पण तितकाच दयाळू व्यक्ती बनतो...
त्याच्या दारातून कोणीही कधी रिकाम्या हाताने परत जात नाही...
सापाने दिलेल्या सर्व अटींचे तो प्रामाणिकपणे पालन करतो...
सापाने दिलेल्या सर्व अटींचे तो प्रामाणिकपणे पालन करतो...
ती व्यक्ती आयुष्यभर त्या सोनेरी सापाची निष्ठेने पूजा करत राहिली...
श्रीमंती आली, पण मनात कधीही गर्व आला नाही...
त्याने दिलेल्या वचनांपासून तो कधीच ढळला नाही...
श्रीमंती आली, पण मनात कधीही गर्व आला नाही...
त्याने दिलेल्या वचनांपासून तो कधीच ढळला नाही...
दारात आलेला कोणीही रिकाम्या हाताने परत गेला नाही
आणि घरात सदाचार व संयम कायम जपला गेला..
आणि घरात सदाचार व संयम कायम जपला गेला..
काळाच्या ओघात तो माणूस वृद्ध झाला... पण त्याची श्रद्धा तशीच अढळ राहिली...
मृत्यूपूर्वी त्याने आपल्या मुलांना एकच गोष्ट सांगितली...
“ही केवळ सोन्याची मूर्ती नाही, ही आपल्या प्रामाणिकपणाची आणि नि:स्वार्थपणाची साक्ष आहे...”
“ही केवळ सोन्याची मूर्ती नाही, ही आपल्या प्रामाणिकपणाची आणि नि:स्वार्थपणाची साक्ष आहे...”
त्याच्या मृत्यूनंतरही त्याची मुले आणि पुढच्या पिढ्या
त्याच संस्कारांवर वाढल्या...
त्याच संस्कारांवर वाढल्या...
आजही त्या घरात सोनेरी नागाची पूजा श्रद्धेने आणि नियमाने केली जाते...
गावकऱ्यांचं म्हणणं आहे की...
आजही, एखादी अत्यंत प्रामाणिक आणि नि:स्वार्थ व्यक्ती
त्या घराच्या देवघरात मनापासून प्रार्थना करत असेल,
तर कधी कधी त्या सोनेरी नागाच्या मूर्तीवर
सूर्यकिरण पडताच एक वेगळीच चमक दिसते…
आजही, एखादी अत्यंत प्रामाणिक आणि नि:स्वार्थ व्यक्ती
त्या घराच्या देवघरात मनापासून प्रार्थना करत असेल,
तर कधी कधी त्या सोनेरी नागाच्या मूर्तीवर
सूर्यकिरण पडताच एक वेगळीच चमक दिसते…
आणि तेव्हाच लोक कुजबुजतात...
“सोनेरी साप अजूनही इथेच आहे…
तो अजूनही माणुसकीची परीक्षा घेतोय...”
“सोनेरी साप अजूनही इथेच आहे…
तो अजूनही माणुसकीची परीक्षा घेतोय...”
ज्याच्या मनात लोभ नाही, त्यालाच आजही
त्या सोनेरी सापाचं दर्शन होतं...
त्या सोनेरी सापाचं दर्शन होतं...
___प्राची कांबळे (मिनू)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा